Breaking
Updated: July 9, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – बीडमध्ये “संरक्षकच ठरला भक्षक” ही म्हण खरी ठरली आहे. जिल्हा पोलिस दलात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत पोलिस कर्मचारी चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अमित मधुकर सुतार असे चोर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ऑनलाईन जुगार, ड्रीम 11 आणि रमी ॲपसारख्या गेम्समध्ये हजारो रुपये गमावलेल्या सुतारने कर्ज फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबला. याआधी त्याने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच बॅटऱ्या चोरल्या होत्या.
अमित सुतार याने 2024 मध्ये बीड पोलिस अधीक्षक कार्यालयातून इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या तब्बल 58 बॅटऱ्या चोरल्या होत्या. या प्रकारानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी त्याचे निलंबन केले होते. तेव्हापासून सुतार जामिनावर बाहेर होता. या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच सुतार याने दोन साथीदारांच्या मदतीने सात दुचाकींची चोरी केली. चोरीच्या या प्रकरणात सुतारवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
अमित सुतार याला ऑनलाइन जुगार, ड्रीम 11, रमी आणि दारूचा नाद होता. अमित सुतारला ऑनलाइन जुगार, दारु, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा होता. दरम्यान पोलिसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, एक पोलिस कर्मचारीच जर गुन्हेगार बनत असेल, तर जनतेच्या सुरक्षेचा विश्वास कोसळतो. जिल्ह्याच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने असा गुन्हा केल्यामुळे पोलिस खात्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आणि संतापाची लाट उसळली आहे.