Breaking

डॉक्टर मधील माणुसकी: अपघातातील महिलेस स्वतःच्या कार मधून रुग्णालयात केले दाखल

Updated: July 8, 2025

By Vivek Sindhu

डॉक्टर मधील माणुसकी: अपघातातील महिलेस स्वतःच्या कार मधून रुग्णालयात केले दाखल

WhatsApp Group

Join Now

अंबाजोगाई -: मोटार सायकल अपघातात महिला जखमी झाली. फोन करूनही रुग्णवाहिका येईना.आली तर तिच्यातले डिझेल संपलेले. अशा स्थितीत कसलाही विचार न करता सामाजिक कार्यकर्ते डॉ.रमेश भराटे यांनी जखमी महिलेस कार मध्ये घेऊन थेट अंबाजोगाईचे रुग्णालय गाठले. जखमी महिलेवर उपचार करण्यासाठी मदतही करून माणुसकीचे दर्शन घडवले.

मंगळवारी सकाळी लातूरहून अंबाजोगाईकडे दुचाकीवरून जात असताना राधिका हालगुंटे वय ३० वर्षे.या मोटारसायकल अपघातात जखमी झाल्या. यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्याच्या कडेला पती व पत्नी गंभीर अवस्थेत होते.येणारे जाणारे सर्व प्रवासी पाहत होते. परंतु मदती साठी कोणी ही पुढे येत नव्हते.त्याच दरम्यान लातूरहून अंबाजोगाई कडे प्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉ रमेश भराटे हे येत होते. त्यांनी हे सर्व पाहिले व उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवण्या साठी प्रयत्न केले. त्यांच्या सोबत केज येथील बांधकाम व्यावसायिक श् विलास थोरात हे होते. बराच वेळ वाट पाहून टोल नाक्यावर असलेली रुग्णवाहिका आली. परंतु त्यांनी मधे डीज़ल नसल्याचे सांगितले.अत्यावश्यक सेवेतील वाहनात डीझेल नसणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.थोडा ही वेळ न घालवतां डॉ रमेश भराटे व विलास थोरात यांनी त्वरित राधिका हालगुंटे व पती यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून संबधितास उपचार त्वरित सुरू करण्यासाठी मदत केली

रुग्णवाहिके बाबत सततच्या तक्रारी

अंबाजोगाई – लातूर रोड वर अपघाताचे सत्र कायम सुरूच आहे. अपघातातील जखमी व्यक्तींसाठी सेलू टोलनाका येथे एक रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र ही रुग्णवाहिका घटनास्थळी कधीच वेळेवर येत नाल्याच्या तक्रार परिसरातील नागरिकांची आहे. आज तर रुग्णवाहिका आली.मात्र त्या गाडीत डिझेलच् नाही. अशी विपरीत स्थिती निदर्शनास आली.