Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील बरदापूर-हातोला रस्त्यावर लिमगाव पाटीजवळ आज (दि.२८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हातोला येथील अभय सतीश चव्हाण (वय २५) आणि ऋषिकेश अशोक चव्हाण (वय १८) हे दुचाकीवरून बरदापूरहून हातोलाकडे जात असताना लिमगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश चव्हाण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही तरुण या अपघातात जागीच ठार झाले आहेत. त्यांची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसली, तरी ते पानगाव येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बरदापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.
Last Updated: June 28, 2025