नागरी सुविधा व इतर गंभीर समस्यांकडे निवेदनातून लक्ष वेधले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – नागरी सुविधा, घरकुले, भोगवटा मालमत्ता मालकी हक्कांत घेणे व इतर गंभीर समस्यांची सोडवणूक करा यासह एकूण सहा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देत शहर विकास संघर्ष समितीचा मोर्चा शुक्रवारी अंबाजोगाई नगरपरीषदेवर‌ धडकला.

शहर विकास संघर्ष समितीच्या वतीने नागरी सुविधा, घरकुले, भोगवटा मालमत्ता मालकी हक्कांत घेणे व इतर गंभीर समस्यांची सोडवणूक करा यासह एकूण सहा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना शुक्रवार, दिनांक २७ जुन रोजी देण्यात आले.