केज – अज्ञात चोरट्यांनी विहिरीवरील पाणबुडी मोटार आणि स्टार्टर लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील सारणी (आ.) शिवारात घडली.
सारणी (आ.) येथील शेतकरी नाना माणिक सोनवणे यांची शिवारात शेती असून शेतातील विहिरीवर ३ एचपी पाणबुडी मोटार आणि स्टार्टर बसविले होते. त्यांनी २३ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पिकाला पाणी देऊन गावातील घरी आले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ही दहा हजार रुपये किंमतीची पाणबुडी मोटार आणि आठशे रुपयांचे स्टार्टर चोरून नेले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.