Breaking
Updated: एप्रिल 9, 2026
विहिरीत पडून ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू?
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे सातेफळ येथील वाघाळवाडी व सातेफळ खसाड शिवारात एका ७० वर्षीय वयोवृद्धाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. छत्रभुज हरिश्चंद्र मोरे (वय ७०, रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे मृत वृद्धाचे नाव असून, ते गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
छत्रभुज मोरे यांची सातेफळ शिवारात ६ ते ७ एकर जमीन आहे. १० वर्षांपूर्वी त्यांनी मोरेवाडी येथील काही जमीन विकून सातेफळ शिवारात ही जमीन खरेदी केली होती. तेव्हापासून ते आपल्या पत्नीसह शेतातच वास्तव्यास होते. त्यांचे दोन विवाहित मुले मोरेवाडी शिवारातील अडीच एकर शेती सांभाळतात. गेल्या तीन दिवसांपासून मोरे बेपत्ता होते, ज्याचा शोध घेतला जात होता.
बुधवारी (८ एप्रिल), सातेफळ शिवारातील माजी सैनिक सूर्यवंशी श्रीरंग यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. हा मृतदेह छत्रभुज मोरे यांचा असल्याची खात्री पटली आहे. दारूच्या नशेत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.