अंबाजोगाई : राज्यातील ग्रामीण भागातील प्रशासनाला आधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने ५०० नव्या ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या यादीत केज विधानसभा मतदार संघातील आडस, होळ, बनसारोळा, युसुफवडगाव चनई आणि मोरेवाडी या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.