Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

केज येथून १९ वर्षाची युवती बेपत्ता

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- कॉलेजला जाते असे सांगून गेलेली १९ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना केज शहरात घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की,  दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ९:०० च्या सुमारास केज शहरातील एका भागात राहत असलेली १८ वर्षीय युवती ही वडील कामा निमित्त परळी येथे गेले असता तिने कॉलेजला जात आहे; असे आईला सांगून घराबाहेर गेली. ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती आढळून आली नसल्याने तीच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

तिचे वय १९ वर्ष असून रंग सावळा, उंची ५ फुट, अंगात फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व त्यावर पांढरे रंगाचे जॅकेट, पायात चप्पल, गळया जवळ ऑपरेशन केलेली खुण, हातात काळया व पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला असे तिचे वर्णन आहे. सदर युवती कुणाला आढळून आल्यास त्यांनी केज पोलिसांशी किंवा नजिकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांनी केले आहे.


Categories

Recent Posts