Breaking
Updated: जानेवारी 14, 2026
शिरूरघाट येथून ५२ हजाराचे सोयाबीनचे १९ कट्टे लांबविले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – घरासमोर सोयाबीनच्या कट्ट्याची थपी लावून ठेवून होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून ५२ हजार २५० रुपयांचे सोयाबीनचे १९ कट्टे चोरून नेल्याची घटना शिरूरघाट (ता. केज) येथे उघडकीस आली.
शिरूरघाट येथील शेतकरी दिपक वचिष्ट सांगळे यांनी शेतातील सोयाबीन मळणी करून सोयाबीनचे कट्टे भरून त्याची थपी घरासमोर लावून ठेवली होती. १२ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या नंतर अज्ञात चोरट्यांनी घरामोर लावलेल्या सोयाबीन कट्ट्याच्या थपीतील ५२ हजार २५० रुपयांचे सोयाबीनचे १९ कट्टे चोरून नेले. १४ जानेवारी रोजी दिपक सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.