Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Updated: नोव्हेंबर 9, 2025

By Vivek Sindhu

InShot 20251108 215626284

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : शहरातील नेताजी नगर परिसरात शनिवारी रात्री सुमारास एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आर्यन आबासाहेब चौरे (वय १६, रा. जीवाची वाडी ता. अंबाजोगाई) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

आर्यनने नुकताच ११ वी वर्गात प्रवेश घेतला होता. तो शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरातील नेताजी नगर भागात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. शनिवारी रात्री त्याने दोरीने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.


Categories

Recent Posts