अंबाजोगाई (प्रतिनिधी) – – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे जिवघेणा हल्ला करणारा शिवधर्म प्रतिष्ठानचा कार्यकर्ता दिपक काटे व त्याचे सर्व सहकारी यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, तसेच गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) कडून मंगळवारी अंबाजोगाईत तीव्र निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनाचे नेतृत्व मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी केले. यावेळी मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
Also Read: ज्ञानराधा प्रकरणात रिझल्ट द्या- मुख्यमंत्री
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या जिवघेणा हल्ला याच्या निषेधार्थ सोमवार, दिनांक १५ जुलै रोजी उपविभागीय कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांनी केलेल्या निदर्शन आंदोलनाने परिसर दणाणून सोडला.
सरकार आणि व्यवस्थेविरोधात निषेधाच्या घोषणा देत, झेंडे घेऊन शेकडो स्त्री, पुरूष व ज्येष्ठ नागरिक या निदर्शन आंदोलनात सहभागी झाले. या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी खरात यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक १५ जुलै रोजी उपविभागीय कार्यालयावर निदर्शन आंदोलन करण्यात आले. या संदर्भात आम्ही प्रशासनाला निवेदन देवून पुर्व कल्पना दिली होती.
मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांच्या वतीने निवेदन ही देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म प्रतिष्ठान तसेच भाजपाचा पदाधिकारी दिपक काटे व त्याचे सहकारी यांनी जो जिवघेणा हल्ला केलेला आहे. त्याचा फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनांनी जाहीर निषेध केलेला आहे. दिपक काटे हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री सिटर आरोपी असून, त्याने सुपारी घेवून हा हल्ला केलेला आहे.
या हल्यामागे आर.एस.एस. सारख्या हिंदूत्ववादी, देश विघातक संघटनांचा हात असल्यामुळे प्रविणदादा गायकवाड यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, प्रोफसर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या पुरोगामी विचारसरणीच्या विचारवंतांची हिंदूत्ववादी संघटनांनी षडयंत्र रचून हत्या केलेली आहे. त्याच पध्दतीने प्रविणदादा गायकवाड यांच्यावर जिवघेणा हल्ला करून त्यांना ही जिवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे.
Also Read:
तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की, आरोपी दिपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करून, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. अन्यथा संपूर्ण मराठवाड्यामध्ये तीव्र निदर्शने करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी.
असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रारंभी निदर्शकांना अक्षय भुंबे, जीवन गायकवाड, धीमंत राष्ट्रपाल आणि मिनाताई लोंढे यांनी संबोधित केले. त्यानंतर सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय युवराज भुंबे, मराठवाडा विभागीय प्रवक्ते धीमंत राष्ट्रपाल, बीड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनाताई लोंढे, रेखा मस्के, बादल तरकसे, प्रथमेश कांबळे, विशाल बनसोडे, सुयश तपकिरे, जनू बनसोडे, यश शेळके, गणेश उपाडे, निलेश कांबळे, नवनाथ कांबळे, महेंद्र गोदाम, पंचशिला राऊत, कालिंदा गायकवाड, जयश्री लोंढे, उमा सोनवणे, राजुबाई गायकवाड, दैवशाला वाघमारे, नम्रता वाव्हळे, समिक्षा वाव्हळे, रूक्मिण वडमारे, राहीबाई कांबळे, संजिवनी वेडे, तेजस्विनी साळवे, रोहित मस्के, प्रकाश कांबळे, ओंकार उपाडे, शुभम वाघमारे, रोहित कांबळे, सुमित शिंदे, अनिकेत भुंबे, अजय भुंबे, गौरव खरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करा :
मागील काही वर्षांत हिंदूत्ववादी संघटनांकडून षडयंत्र, कट रचून व ठरवून पुरोगामी विचारसरणीच्या विचारवंत, लेखक, पत्रकार, नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. त्याच पध्दतीने प्रविणदादा गायकवाड यांच्यावर जिवघेणा हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी मा.गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही मागणी करीत आहोत की, हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करून, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. पुरोगामी नेते व कार्यकर्ते यांच्यावरील हल्ले वेळीच थांबविले नाही. तर यापुढे आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद आपण, शासन व प्रशासनाने घ्यावी.
~ अक्षय भुंबे
मराठवाडा विभागीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)