Breaking
Updated: July 7, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील घटना
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुराज सिद्धेश्वर कोळगिरे (वय १८) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.
मयत गुरुराज कोळगिरे हा सध्या लातूर येथील शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी राडी येथे आला होता. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या आधी, त्याने घरातील अभ्यासाच्या खोलीत छताच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.