Breaking
Updated: July 12, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – केज शहरातील बसस्थानकावर रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने तोंडाला बांधून फिरणाऱ्या तरुणास गस्त घालणाऱ्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम, जमादार बाळासाहेब अहंकारे हे १० जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना जुबेर ऊर्फ मारी मुस्ताक फारूकी (रा. रोजा मोहल्ला, केज) हा बसस्थानकात अंधारात चेहरा झाकून चोरीच्या उद्देशाने फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. जमादार बाळासाहेब अहंकारे यांच्या तक्रारीवरून जुबेर ऊर्फ मारी फारूकी याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार हनुमान मुंडे हे करीत आहेत.