Breaking
Updated: July 12, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – मस्साजोग (ता. केज) शिवारातून साडेपाच लाख रुपयांची दीड हजार किलो अल्युमिनीयमची विद्युत तार तर केज शिवारातून ६७ हजार दोनशे रुपयांची अल्युमिनीयमची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
केज शहरातील शिवाजी नगर भागातील महादेव बाबुराव इंगळे या विद्युत महावितरणच्या गुत्तेदारास मस्साजोग व सारणी सांगवी या गावातील सिंगलफेजक कामाचे टेंडर मिळाल्याने या कामासाठी त्यांनी गेल्या महिन्यात अल्युमिनीयमच्या विद्युत तारेचे तीन ड्रम आणून मस्साजोग शिवारातील अजिंक्य हॉटेलच्या बाजुस मोकळ्या जागेत ठेवलेले होते. ३ जुलै रोजीच्या रात्री १० ते ४ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांची दीड हजार किलो अल्युमिनीयमची विद्युत तार चोरून नेली. गुत्तेदार महादेव इंगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार सुकुमार बनसोडे हे करीत होते.
तसेच, केज शिवारातील शेत गट नं. ४१२ मध्ये १५ ते २० वर्षांपूर्वी बसविलेल्या १० लोखंडी पोलवरील लघुदाब असलेली थ्रीफेस फोरवायर असलेल्या तारे पैकी ६७ हजार दोन रुपयांच्या २४०० फूट लांबीच्या अल्युमिनीयमच्या तीन तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ११ जुलै रोजी उघडकीस आले. विद्युत महावितरणचे कनिष्ठ अभियंता साईकराम अंडील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार महावीर सोनवणे हे करीत आहेत.