Breaking
Updated: July 11, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत पद्धतीने आरक्षण प्रक्रिया येत्या १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांवरील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रिया सार्वजनिकरित्या व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून, इच्छुक ग्रामस्थांनी व स्थानिक प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी केले आहे.
ही आरक्षण प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणत्या गटातून कोणत्या सामाजिक प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित राहील, याचे स्पष्ट चित्र यावेळी समोर येणार आहे.
तालुक्यातील ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक प्रतिनिधींनी तहसील कार्यालय, अंबाजोगाई येथे १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहून सदर प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.