Breaking
Updated: May 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupमुंबई – मॉन्सूनने आजही प्रगती केली नाही. मॉन्सून दोन दिवस एकाच भागात मुक्कावर होता. तर राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र पुढील ५ पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
मॉन्सूनने आज प्रगती केली नाही, त्यामुळे मॉन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. मात्र मॉन्सून पुढील २ दिवसांत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागात हलक्या सरी झाल्या तर काही भागात पावसाची उघडीप होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील ५ दिवस विदर्भ वगळता पाऊस कमीच राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.