Breaking
Updated: July 5, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज -एका अपंग व मतिमंद तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली.
तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय अपंग व मतिमंद तरुणी ही ४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता घरी एकटीच असल्याची संधी साधून बाळू जालिंदर कांबळे (रा. लव्हुरी) याने घरात घुसून विनयभंग केला. पीडित तरुणीच्या चुलतीने दिलेल्या तक्रारीवरून बाळू कांबळे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे हे करीत आहेत.