Breaking

बीडचे बिंदुसरा धरण भरले

Updated: May 30, 2025

By Vivek Sindhu

बीडचे बिंदुसरा धरण भरले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड – बीड तालुक्यातील पाली येथे असलेला बिंदुसरा धरण प्रकल्प मान्सुनपूर्व पावसानेच 100 टक्के क्षमतेने भरला असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.30) रोजी बिंदुसरा धरणात जलपूजन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या मान्सूनपूर्व पावसाने बीड शहराला लागून असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी ओसंडून वाहत आहे.

पावसाळ्यापूर्वीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने नागरिक आणि शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु यासोबतच नदीकाठच्या नागरिकांनी पूरपरिस्थिती संदर्भात सतर्क राहून खबरदारी घेण्याचेही आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. दरम्यान आ.क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरणाची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी महसूल विभाग, जलसंपदा विभाग, जायकवाडी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती विभागाचे अधिकारी उपस्थित होते.