Breaking
Updated: June 24, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज -केज तालुक्यातील रामेश्वरवाडी (हंगेवाडी) येथील शिवाजी सिताराम मोराळे यांचा मुलगा श्रेयस हा ऋषभ रमेश आंधळे या मुलासोबत खेळत असताना त्यांना छकुली रामहरी हांगे या महिलेने इथे कशाला खेळतात असे म्हणत शिवीगाळ करीत होती. यावेळी शिवाजी मोराळे यांच्या पत्नी मनिषा यांनी मुलांना शिव्या का देता असे विचारले असता मुले खेळताना आरडा ओरड करीत असल्याने त्रास होतो असे म्हणत त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. भांडणाचा आवाज ऐकून गेलेले शिवाजी मोराळे यांना थांबा, तुम्हाला दाखवते असे म्हणत तिचे पती रामहारी बाबुराव हांगे व सासरे बाबुराव राजाराम हांगे यांना फोन करून बोलावून घेतले. रामहारी याने कोयत्याने हाताचे बोटांवर मारून दुखापत केली. तर बाबुराव यांने काठीने मांडीवर मारून मुक्कामार दिला. तर किशकिंदा हांगे व छकुली हांगे यांनी त्यांच्या पत्नी मनीषा यांच्या डोक्याच्या केसांना पकडून चापटाबुक्याने मारहाण करीत तुम्हाला येथे राहु देणार नाहीत, तुम्ही जर येथे दिसलात, तर तुम्हाला जिवे मारून टाकतोत अशी धमकी दिली. अशी तक्रार शिवाजी मोराळे यांनी दिल्यावरून रामहारी हांगे, बाबुराव हांगे, छकुली हांगे, किशकिंदा हांगे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.