Breaking

आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत ८०० विद्यार्थ्यांना होणार स्कूल कीट वाटप

Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

मातांना साडीचोळी भेट

WhatsApp Group

Join Now

पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना आधार


अंबाजोगाई : आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत रविवारी (दि.६) गरजू व वंचित घटकातील ८०० विद्यार्थ्यांना स्कूलकिट व मातांना साडी चोळी वाटप होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून पालकांचे छत्र हरवलेल्या शालेय व उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून या शैक्षणिक साहित्याचा आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी येथे दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील प्रसिध्द व्याख्याते इंद्रजित देशमुख हे राहणार आहेत. बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, आयआरएस अधिकारी नितिका विलाश (काँवत), ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संचालक अरुण करमरकर, डाॅ. सुनिता बिराजदार, मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे निवृत्त समाज विकास अधिकारी राजेश कांबळे, गंगा माऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंतकाका मोरे, केएसबीएल ग्रुपचे संचालक शेख शकील बागवान, अर्थवेल पतसंस्थेचे संस्थापक बालासाहेब माने, उद्योजक सरला मर्लेचा, यश डेअरीच्या संचालक संगीता जाधव, जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालक ज्योती जाधव, सहशिक्षक स्नेहा लोमटे, आरोग्य अधिकारी डाॅ. आशा मारवाले (जुने), डाॅ. अश्विनी साबळे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.

आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, एचायव्ही बाधीत व कोरोनाग्रस्त कुटूंबातील ८०० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याची स्कूलकिट देण्यात येणार आहे.

तयारी पूर्ण

येथील सायली मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि.४) दिवसभर या उपक्रमातील ६० स्वयंसेवक महिला, युवक व विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे योगदान देत ८०० स्कूल किट तयार करण्यास मदत केली. या किटमध्ये स्कूलबॅगसह तिन प्रकारच्या वह्या, रजिस्टर, पेन सेट, स्केच पेन, कंपास, इरेझर, शाॅपनर, पाणी बाॅटल असे साहित्याचे हे स्कूलकिट असणार आहे.