Breaking
Updated: May 29, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : आज गुरुवार, दिनांक २९ मे रोजी सकाळच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एक दुर्दैवी अपघात घडला. एमएच १४ एमएच १७०१ या क्रमांकाच्या एस.टी. बसच्या खाली येऊन एक तरुण चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत तरुणाचे नाव अंकुश मोरे (रा. धानोरा बु., ता. अंबाजोगाई) असे आहे. स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश करत असताना सदरील बसने अंकुश यांस चिरडले. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.