खिशातून २० हजार काढून घेणाऱ्यास अटक
केज - काळेगावघाट ( ता. केज ) येथे घरासमोर थांबलेल्या शेतकऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत बळजबरीने पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी संबधित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
काळेगावघाट येथील शेतकरी पांडुरंग बाबुराव काळे हे १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या घराच्या बांधकामासमोरील रस्त्यावर थांबले होते. याचवेळी त्यांच्या गावातील सुमित प्रल्हाद धिवार हा त्यांच्या जवळ आला. त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करीत बळजबरीने पांडुरंग काळे यांच्या पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतले. अशी तक्रार पांडुरंग काळे यांनी दिल्यावरून सुमित धिवार याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल होतास आरोपीस अटक करण्यात आली आहे. फौजदार आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.