Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेअंतर्गत शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बीड  तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसितगृह योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात बीड जिल्हयात मुलांसाठी 6 व मुलींसाठी 6 अशी एकूण 12 वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत.

      बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, केज, पाटोदा, परळी वै आणि माजलगाव या ठिकाणी मुलांचे-1 व मुलींचे -1 असे 100 विद्यार्थी  क्षमतेचे 12 वसतीगृह सुरू करण्यात आलेले आहेत.

 शैक्षणीक वर्ष 2023-24 मध्ये ऊसतोड कामगारांच्या इयत्ता 5 वी पासुन पुढील अभ्यासक्रमाच्या पाल्यांनी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतीगृहांध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

          वसतीगृह प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज हे संबंधीत वसतीगृहामध्ये उपलबध आहेत. वसतीगृह प्रवेशाकीरता खालील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा.

के. वाय. बरबडे, गृहपाल. मोबाईल क्र. 9881958674 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह गेवराई , संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, माजलगाव, अमिता जाधव गृहपाल मो. क्र. 9588682031, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह बीड, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, गेवराई. संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, माजलगाव एन.डी. सराफ, गृहपाल मो क्र. 9405079422 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, बीड एस. बी. बनसोडे, गृहपाल केज मो. क्र. 9766910411 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, , आर. डी. गव्हाणे, गृहपाल मो. क्र. 9975206970 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, परळी वै, , एस एस भवरे, गृहपाल मो. क्र. 7387155771, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, केज, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, परळी वै के. बी. बुटे, गृहपाल मो. क्र. 8605178255, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, पाटोदा विनोद वराट, गृहपाल मो.क्र. 9130314220 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, पाटोदा. यांच्याशी संपर्क साधावा.

Thursday 25th of May 2023 06:45 PM

Advertisement

Advertisement