Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ८ डिसेंबर रोजी परिसर मुलाखतीचे आयोजन

अंबाजोगाई  - येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण व सेवायोजन कक्षाच्या वतीने बुधवार,दिनांक ८ डिसेंबर रोजी युवकांसाठी जस्ट डायल लिमिटेड,पुणे या कंपनी अंतर्गत विक्री व विपणन (सेल्स ॲड मार्केटिंग) या पदासाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मुलाखतीतून अंबाजोगाई,केज,परळी,धारूर, माजलगाव तालुक्याकरीता प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.तसेच धुत ट्रान्समिशन,औरंगाबाद यांच्या मार्फत युवतींसाठी "कंपनी वर्क ट्रेनी" या पदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी करीता परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या मुलाखतीमध्ये पदवी,पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.बी.तांदूळजेकर,उपप्राचार्य डॉ.रमेश शिंदे,प्रा.प्रताप जाधव,प्रा.हनुमंत कलबुर्गे यांनी केले आहे.सदरील परिसर मुलाखती संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश (भाऊ) चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके,महाविद्यालय विकास समिती सदस्य रमेशराव आडसकर, दत्तात्रय (आबा) पाटील,डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आले आहे.मुलाखती मध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर व एॅपियर विद्यार्थी पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईल,बायोडेटा,पासपोर्ट फोटोसह बुधवार,दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता महाविद्यालयात उपस्थित रहावे.अधिक माहितीसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील डॉ.अहिल्या बरूरे-(९४०४२९९४११),डॉ.इंद्रजीत भगत-(९६६५७८६६५४),डॉ.अरविंद घोडके-(९९२२७००५०९),डॉ.विठ्ठल केदारी-(९६०४६७०२०८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Friday 3rd of December 2021 06:17 PM

Advertisement

Advertisement