Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नोंदणी व मुद्रांक कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी चालु असलेल्या संपास मुद्रांक विक्रेता व दस्तलेखकांचा जाहीर पाठिंबा

माजलगांव दि.२२(प्रतिनिधी)राज्यातील नोंदणी  व मुद्रांक विभागातिल कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी जो राजव्यापिय संप दि.२१ रोजि पासुन चालु आहे त्यास माजलगांव येथिल मुद्रांक  व दस्तलेख यांनी निवेदनाद्वारे जाहिर पाठिंबा दिला आहे.

        याबाबत माहिती अशी कि,राज्यातिल नोंदणी  व मुद्रांक विभागातिल सर्व कर्मचारी त्यांचे विविध मागण्यासाठी हे बेमुदत संप दि.२१ रोजी पासुन चालु केला आहे.त्यास माजलगांव येथील मुद्रांक व दस्तलेखक यांनी अप्पर मुख्यसचिव,महसुल व मुद्रांक व नोंदणी विभाग यांना  आज माजलगांव तहसिलदार मार्फत यांना निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी अशोकराव बुरंगे,शरद भांडेकर,सुनिल सावळगे, विजय राऊत,दिनकर रुपदे, राजेंद्र कुलकर्णी,प्रकाश काठवटे,परमेश्वर नांगरे, बालासाहेब गिरी,प्रभाकर कांबळे,अभय दरफडे,पंडीत राठोड,सचिन टाक,राजु जाधव,बालासाहेब महाजन, अच्यत पवार,फेरोज पठाण, रविंद्र राऊत व इतर मु्द्रांक विक्रेते व दस्तलेखक हजर होते.

Wednesday 22nd of September 2021 09:42 PM

Advertisement

Advertisement