Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

काडीवडगाव येथे कै.आबासाहेब बादाडे पाटील यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

वडवणी  -तालुक्यातील काडीवडगाव येथील पहिले सरपंच के आबासाहेब रोहिदास बादाडे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक ऊप आरोग्य केंद्र काडीवडगाव येथे रक्तदान शिबिर , शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , कोरोना जनजागृती शिबिर , आय एम सी विविध आजारावर माहिती अशा विविध कार्यक्रमाने पार पडला . 

     या कार्यकमाचे अध्यक्ष म्हणुन बीड जि बँकेचे संचालक बाबरी मुंडे , तर ऊदघाटक हणुन जि प स औदुंबर सावंत , लढा दुष्काळ टीमचे अध्यक्ष अँड राज पाटील , तर प्रमुख पाहुणे मच्छिंद्र झाटे , प्रा सत्य प्रेम मगर , बजरंग साबळे , ज्ञानेश्वर सुरवसे , डॉ देवेंद्र थोटे , पत्रकार रामेश्वर गोंडे , अनिल बादाडे , श्री राम बादाडे , अमोल खळगे , दिपक आंबुरे , सरपंच बाळासाहेब राऊत , मोहन बादाडे , भगवान बादाडे , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते .

     कार्यक्रमात प्रथम माँ जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज के आबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात बीड जि . बँकेचे संचालक बाबरी मुंडे म्हणाले की बादाडे पाटील  परिवाराने त्यांच्या वडिलांच्या  पुण्यतिथीनिमित्त असामाजिक  चांगला कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून  आभार व आम्हीहि सुरुवातीला वाढदिवसानिमित्त विपरीत खर्च करीत होतो परंतुज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्तदान  शिबिर सारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत त्यामुळे आपल्या वडवणी तालुक्याचा रक्तदानात  मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.जि प सदस्य औदुंबर सावंत प्रा सत्यप्रेम मगर प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर सुरवसे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते बाळासाहेब बादाडे यांनी केले व आभार भारत आप्पा बादाडे यांनी मानले .

Monday 6th of July 2020 06:44 PM

Advertisement

Advertisement