चिंचोलीमाळी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
केज - एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे घडली. संतोष कारभारी नेमट असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
चिंचोलीमाळी (ता. केज) येथील शेतकरी संतोष कारभारी नेमट (वय ४२ ) यांनी १० मे रोजी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी इनाम नावाच्या शेतातील पत्र्याच्या शेडमागील बाभळीच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती बिट जमादार बालासाहेब बांगर व त्यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे. मयताचा भाऊ वचिष्ट कारभारी नेमट यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. जमादार बालासाहेब बांगर हे तपास करीत आहेत.