विहिरीच्या कठड्याचे काम चालू असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा मृत्यु
माजलगाव - विहिरीच्या कठड्याचे काम चालू असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील नित्रुड जवळील एका तांड्यावरील शेतात रविवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान घडली.
नित्रुड जवळील मास्तर तांडा जवळील एका शेतात विहीर खोदकाम झालेले आहे.सदरील विहिरीच्या कटाड्याचे काम चालू होते. ट्रॅक्टरने लेव्हलिंग करत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरसह चालक विहिरीत पडल्याने घटनेत चालकाचा मृत्यू ाला. विहिरीत परसभर पाणी असल्याने गावकर्यांनी पाण्यात उड्या मारत प्रेतास बाहेर काढले. भाऊसाहेब साहेबराव राठोड (वय 30 वर्ष) रा.बदुनायक तांडा असे ट्रॅक्टर चालकाचे नाव असून दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून प्रेतास उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात,पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल भालेराव, पोलीस नाईक बालाजी सूरेवाड अधिक तपास करत आहेत.
