Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गेवराईच्या पूर्व तपासणी शिबिरास दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खा.प्रितमताई मुंडे यांनी भेट देऊन दिव्यांगांशी साधला संवाद

गेवराई  -  सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराला काल दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमातून जिल्ह्यातील गरजू आणि पात्र दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अनुषंगाने काल गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले.

जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकार व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिबिराचे काल गेवराईत खा. मुंडे यांनी उदघाटन केले, विधानसभेचे सदस्य आ. लक्ष्मण पवार यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवित असतो. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना देखील घरपोच भोजन पुरवण्याची व्यवस्था केली होती. परिस्थिती कितीही बिकट असो प्रत्येक क्षणी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तुमच्या सेवेसाठी कार्यरत असेल, या शिबिराच्या माध्यमातून निराधार आणि दिव्यांगांची सेवा करण्याचा, त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील निराधार वर्गाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आधार देण्यासाठी सदरील योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा सेवेचा वसा पुढे नेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सेवाकार्य आम्ही करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Friday 26th of May 2023 06:22 PM

Advertisement

Advertisement