Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांविरोधात गुन्हा दाखल करणार - उपमुख्यमंत्री

मुंबई: शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकर्‍यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्यार्‍या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

राज्य सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. बोगस खतं आणि बियाणं विकणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या सिबिल स्कोअरचा बाऊ करुन, कर्ज नाकारणार्‍या बँकाना धडा शिकवा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले आहेत. राज्य सरकारच्या भूमिकेला मानत नाही, अशा बँकांना झटका द्यावाच लागेल आणि त्यासाठी एक तरी एफआयआर केला पाहिजे अशा शब्दांत फडणवीसांनी आपला संताप व्यक्त केला.
शेतकर्‍यांसाठी खतं आणि बियाणांची तजवीज करण्यात आली असून, शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे
शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत. कर्ज देताना शेतकर्‍यांचा अडवणूक झाली किंवा शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केल्यास, अशा बँकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत. त्याचसोबत, बँकांनी सरकारचे आदेश मानले नाहीत तर, त्यांना झटका द्यावाच लागेल, असा कडक इशाराच फडणवीसांनी दिलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, शेतकर्‍यांच्या सिबिल स्कोअरचा बाऊ करुन कर्ज नाकारणार्‍या बँकाना धडा शिकवा. ज्या बँका शेतकर्‍यांच्या सिबिल स्कोअरचे कारण देवून शेतकर्‍यांना कर्ज नाकारत आहेत अशा बँकांवर गुन्हे दाखल करा.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोगस बियाणे आणि बोगस खतं शेतकर्‍यांकडे पोहोचतात. त्यावर शेतकर्‍यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बँका राज्य सरकारच्या भूमिकेला मानत नाहीत. पण यापुढे असं झालं तर त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या बँकांना झटका दिल्याशिवाय जमणार नाही.  राज्यात लागू असलेली सौरउर्जा कृषीपंप योजना ही आता केंद्र सरकार देशभर राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  

Wednesday 24th of May 2023 07:09 PM

Advertisement

Advertisement