Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर दांपत्यावर अखेर गुन्हा दाखल

माजलगाव - येथील जाजू हॉस्पिटलमध्ये सोमवारी (दि.१६) प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. अखेर याप्रकरणी सोमवारी रात्री डॉ. जाजू दांपत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 सोनाली पवन गायकवाड (वय २३, रा. खेर्डा) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. सोनालीचे वडील मुकुंद मुंजाबा काळे यांच्या फिर्यादीनुसार, सोनालीला बाळांतपणाचा त्रास सुरु झाल्याने रविवारी सायंकाळी जाजू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. यावेळी डॉ. उर्मिला जाजू यांनी सोनालीस प्रसुतीसाठी दवाखाण्यात अॅडमीटकरून घेतले. रात्री ११ वाजताच्या सुमारास सोनालीचे जास्त दुखु लागळ. त्यामुळे मुकुंद यांनी डॉ. उर्मिला जाजू यांना त्याबाबत सांगितले. मात्र, असे दुखत असते, थोड्यावेळात नार्मल प्रसुती होईल असे संगितले. त्यांनतर सोमवारी पहाटे ३ वाजता सोनालीला अचानक झटका येऊन बेशुध्द पडली. यावेळी डॉ. उर्मिला जाजू आणि डॉ. विजयकुमार जाजू या दोघांनी सोनालीला तपासून ऑक्सिजन लावला आणि शुद्धीवर आणले. त्यानंतर सीझर साठी विनंती करूनही जाजू दांपत्य नॉर्मल प्रसूती होईल यावर ठाम होते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुलगी सोनालीची नॉर्मल प्रसुती झाली व मयत अवस्थेतील बाळ जन्मले. यावेळी सोनाली शुध्दीवर होती. थोड्या वेळातच डॉ. उर्मिला जाजू यांनी डॉ. काकाणी मॅडम यांना बोलावून घेतले. त्यांनी सुद्धा सोनालीस तपासून पेशंटची पिशवी वेगळी आहे असे सांगीतले होते. त्यानंतर डॉ. उर्मिला जाजू यांनी सोनालीला औरंगाबाद किंवा अंबाजोगाई येथे घेऊन जाण्यास अचानक सांगितले. अचानक पेशंटला कसकाय दुसरीकडे नेणार असे विचारूनही काही वेळातच त्यांनी सोनालीच्या कुटुंबियांकडून बिल भरून घेऊन तिला डिस्चार्ज दिला आणि बाहेर घेण्यास सांगितले. पर्याय नसल्याने मुकुंद यांनी सोनालीला रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, परंतु वाटेतच सोनालीचा मृत्यू झाला. त्यानंतर सोनालीचा मृतदेह घेऊन ते जाजू हॉस्पिटलला परत गेले असता डॉ. उर्मिला जाजु यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर डॉ. उर्मिला जाजु व डॉ. विजयकुमार जाजु यांचे दवाखाण्यात ऑपरेशन थियेटर, भुलतज्ञ, बालरोग तज्ञ नसतांना आणि प्रसूतीसाठी आवश्यक उविधा उपलब्ध नसताना सोनालीची धोकादायक पद्धतीने प्रसुती केली, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच सोनाली आणि तिच्या बलाचा जीव गेला अशी तक्रार मजलाग्व ठाण्यात दिली. सदर तक्रारीवरून डॉ. उर्मिला जाजू आणि डॉ. विजयकुमार जाजू या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात आला.  

Tuesday 17th of May 2022 09:52 PM

Advertisement

Advertisement