Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीडमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड - बीड शहरात धक्कादायक घटना समोर आली असून एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपुर्वी सदर मयत विद्यार्थ्याने कुटुंबियांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज ही केला. या विद्यार्थ्यांने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून है टोकाचे पाऊल उचलले आहे.
पंकज बबन काळे (वय 21) (रा. जिजामाता चौक बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे. मयत पंकज याने आत्महतेपुर्वी मी है। सहन करू शकत नाही, मला माफ करा असा व्हॉट्सअ‍ॅपवर कुटुंबियांना मेसेज केला त्यानंतर त्याने गळफास घेतला. याप्रकरणी किशोर पिंगळे, रणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत उर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी या पाच सावकारांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच पैकी एका सावकाराला पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपी फरार आहेत. आत्महत्याग्रस्त पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्तार अधिकारी आहेत. त्यांनी किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून 7 लाख रुपये 2019 मध्ये 10 रुपये शेकडा दराने घेतले होते. या पैशाच्या बदल्यात सावकाराने काळे यांची 60 आर जमीन व राहते घर नोटरी करून घेतले होते.
काळे यांनी व्याजासह मूळ रक्कम पिंगळे यास परत केली मात्र तरीसुद्धा पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. याशिवाय पिंगळेकडून सतत मारहाण व धमक्या देण्यात येत होत्या. यातूनच पंकज याने राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यावेळी तो घरात एकटाच होता. पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.

Tuesday 17th of May 2022 08:34 PM

Advertisement

Advertisement