Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

राज्यात आम्ही भाजप सोबत, बीड जिल्ह्यात नाही - आ. विनायक मेटे

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसंग्राम पूर्ण ताकदीनिशी लढणार

अंबाजोगाई - राज्यात आम्ही युतीमधील घटकपक्ष म्हणून भाजप सोबत आहोत, मात्र बीडमध्ये भाजपला आमच्यासोबत युती करायची नाही हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे कोणाच्या आशेवर न राहता आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. बीड जिल्ह्यात आम्ही पूर्ण ताकदीनिशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी जाहीर केले. 

या बातमीचा व्हिडीओ पहा - https://youtu.be/ssJM08pvtZo

सोमवारी (दि.१६) अंबाजोगाईत शिवसंग्रामची कार्यकर्ता बैठक पार पडली. यानिमित्ताने अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. मेटे यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली. राज्यात आम्ही युतीमधील घटकपक्ष म्हणून भाजप सोबत आहोत. बीड जिल्ह्यात मात्र भाजपला आमच्या युतीत रस नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे कोणाच्या आशेवर न राहता आम्ही तयारी सुरु केली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसंग्राम ताकदीनिशी लढणार आहे. गावोगावी शिवसंग्रामचा विचार पोहोंचविणार आहे. शेतकरी, युवक आणि समाजातील विविध घटकांचे प्रश्‍न घेवून लोकलढा उभारणार आहोत. नगर परिषदेच्या ठिकाणी आमची ताकद आणि तयारी पाहून ऐनवेळी भूमिका जाहीर केली जाईल असे आ. मेटे यांनी सांगितले. जर बीड जिल्ह्यातील भाजपाला आमच्यासोबत युती करावी असे वाटले तर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी त्याबाबत निर्णय घेतील असेही आ. मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

Monday 16th of May 2022 06:26 PM

Advertisement

Advertisement