छत्रपती संभाजी राजांची कारकीर्द तेजोमय; रवी मठपती
स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती.लहान असल्या पासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते.अशी माहिती पत्रकार रवी मठपती यांनी दिली.
तालुक्यातील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र येथे अंजलीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ मे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर व्यसन मुक्ती केंद्राचे प्रमुख डाॅ.राजकुमार गवळे, सचिन वाघमारे यांची उपस्थिती होती.दरम्यान पत्रकार रवी मठपती यांनी उपस्थित रुग्णांना सकारात्मक ऊर्जा वाढवा. मनोबल खचू देऊ नका. आरोग्य हीच संपत्ती आहे. व्यसन मुक्त व्हा.आनंदी जीवन जगा.असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राजपंखे यांनी केले. ओम डोलारे,गणेश गुजर, बीपीन कांबळे, प्रज्ञा वेडे, निशा कांबळे, डॉ. संध्या वाघमारे, रेणुका लोहारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. दुर्गा शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
