Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

१९९९ बॅचने जुन्या आठवणीला उजाळा देत स्नेह संमेलन सोहळा

तब्बल २३ वर्षानंतर बालपणीच्या आठवणींना मिळाला उजाळा

 किल्ले धारूर - किल्लेधारूर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सरस्वती माध्यमिक विद्यालय व जनता माध्यमिक विद्यालयातील १९९९ बॅच दहावी मित्र मैत्रिणी तब्बल २३ वर्ष नंतर एकत्र येत स्नेहमिलन संमेलन सोहळा अर्थात गेट-टुगेदर सुजन लॉन्स येथे  रविवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित जुन्या आठवणीना उजाळा देत हा सोहळा संपन्न झाला.

 किल्लेधारुर शहरात तब्बल २३ वर्षानंतर १९९९ वर्ग  मित्र मैत्रीण एकत्र  येत  स्नेहसंमेलत सोहळा आयोजित केला या मध्ये प्रमुख पाहुणे माजी  प्राचार्य ए आर पाटील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा गायकवाड, महादेव शिनगारे, पुरुषोत्तम मुळे, सरस्वती विद्यालयाचे उद्धव साखरे ,रामचंद्र शेवते, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार सौ अरुना ताथोडे, ही सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. आजची शिक्षण पध्दत कोणत्या दिशाला जात आहे याचा विचार करण्याची गरज आहे,शिक्षण घेत जात असताना कोणत्या जात धर्म काय हे न विचारता ते शिक्षण हे चांगले पिढी घडवणारे असले पाहिजे असे विचार  माजी प्राचार्य ए आर पाटील यांनी व्यक्त केले यावेळी सर्व मान्यवर आपले विचार व्यक्त केले.  

कार्यक्रम सुरवात छत्रपती शिवाजी महाराज  व सरस्वती देवी च्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली त्या नंतर १९९९ वर्ग मित्र व मैत्रीण अकाली निधन झाले व शिकवणारे जे शिक्षक निधन झाले त्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवर भाषण झाले अनेक विद्यार्थी नी आपल्या आठवणींना उजाळा देत शाळेतील  गप्पा गोष्टी मारत खूप जुन्या आठवणी गप्पा मारत दिवस रंगला यावेळी  किल्लेधारूर शहर व परिसरातील सर्व मित्र-मैत्रिणींनी गेट-टुगेदर ची सुंदर अशी व्यवस्था रंगारगल्ली तील सुजल लॉन्स याठिकाणी करण्यात आले यावेळी दिवसभर भरगच्च असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे यातून सर्व मित्र-मैत्रिणींची ओळख होऊन इतर प्रसंगी सुख दुःखामध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी सहकार्य देण्याचा संकल्प केले

 या कार्यक्रमासाठी १९९९ बॅचचे जवळपास दीडशे ते दोनशे मित्र-मैत्रीण सहभागी झाले होते हा गेट टुगेदर अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यात आले

Monday 16th of May 2022 12:35 PM

Advertisement

Advertisement