Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पूस सेवा सहकारी सोसायटी पंकजा मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय*

अंबाजोगाई - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पद्मावती शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील पूस सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या असून राष्ट्रवादीच्या पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे.  पंकजा मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पुस सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू आज आलेल्या निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पद्मावती शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत सर्वश्री  पांडूरंग आकाते, मधुकर आडसुळे, आदिनाथ गौरशेटे, शिवाजी घोलप,पठाण आझाद ईस्मालखाँ, दगडू पवार, रामराजे पवार, हरिश्चंद्र हाके, मैनाबाई उदार,मीराबाई  देशमुख, पलिंका हाके, सचिन गौरशेटे, रघुनाथ गायके यांचा समावेश आहे.

पॅनलचे प्रमुख आदिनाथ गौरशेटे  आणि सर्व विजयी उमेदवारांचे पंकजा मुंडे यांनी अभिनंदन  करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday 16th of May 2022 11:49 AM

Advertisement

Advertisement