Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लव्ह मॅरेजला अडीच महिन्यातच लागली दृष्ट; विवाहितेला जिवंत जाळण्याचा पतीने केला प्रयत्न

गेवराई - अवघे अडीच महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीला तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणत पतीसह सासू, सासऱ्याने पेट्रोल ओतून पेटवून दिले. परंतु तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत कसाबसा जीव वाचविला. ही घटना शनिवारी (दि.१४) दुपारी गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथे घडली.

 प्रतीक्षा अजय राजगुडे (वय २९, रा. दिमाखवाडी) असे त्या नवविवाहितेचे नाव आहे. प्रतीक्षाच्या फिर्यादीनुसार, तिचे अजय सुरेश राजगुडे याच्यासोबत प्रेम संबंध असल्याने ते दोघे यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी पळून गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी २३ फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न लावून दिले. सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर अजय, सासरा सुरेश शहादेव राजगुडे आणि सासू संगीता सुरेश राजगुडे या तिघांनी तू पांढऱ्या पायाची आहेस असे म्हणून प्रतीक्षाचा छळ सुरु केला. तसेच, हुंड्यापोटी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून उपाशीपोटी ठेवू लागले. याच मागणीसाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्या तिघांनी संगनमताने प्रतीक्षाच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तेंव्हा प्रतीक्षाने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळ काढला आणि पेटलेली साडी मातीत घुसून विझविली. त्यानंतर नैराश्यातून ती जीव देण्यासाठी विहिरीकडे पळू लागली, तेंव्हा नातेवाईकांनी तिला अडवले. सदर फिर्यादीवरून प्रतीक्षाचा पती, सासरा आणि सासूवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

Monday 16th of May 2022 11:30 AM

Advertisement

Advertisement