Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शौर्य , पराक्रम व धाडसाचे प्रतीक म्हणजेच दुसरे छत्रपती संभाजी महाराज होय - राजकिशोर मोदी

अंबाजोगाई(प्रतिनिधी):-स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य , पराक्रम व धाडसाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे गौरवोद्गार अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी काढले .ते आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना ते बोलत होते .याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत महादेव आदमाने , सुनील वाघळकर, धम्मा सरवदे , प्रवीण जायभाय , गणेश मसने , राणा चव्हाण , सुनील व्यवहारे ,सचिन जाधव , गोविंद पोतंगले , खलील जाफरी , प्रवीण पोटभरे ,शरद काळे , भारत जोगदंड ,अमोल मिसाळ ,  आदीजण उपस्थित होते .

             याप्रसंगी प्रथमतः छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले . छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची महती सांगताना राजकिशोर मोदी म्हणाले की सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारा म्हणजेच संभाजी राजा , बळी राजाचा अवतार म्हणजे संभाजी राजा . शहाजी राजाचे स्वप्न म्हणजे शंभुराजा जिजाऊ चे संस्कार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अशा प्रकारची आपल्या कर्तृत्वाने आपली ओळख व छाप पाडली होती .

            वयाच्या बत्तीसाव्या  वर्षी या राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी  छञपतीच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या देहाचे बलिदान करणारा महान राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज, अशा या महान विभूतीस त्यांच्या जन्मोत्सवा निमित्त शतश: वंदन व त्यांनी  त्रिवार मानाचा मुजरा अशा प्रकारे राजकिशोर मोदी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Saturday 14th of May 2022 04:51 PM

Advertisement

Advertisement