Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

केज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

केज  - केज  येथे  प्रथमच अन्न व भेसळ चे नवीन लायसन काढणे साठी अन्न व औषध प्रशासन कार्यालय बीड येथील अन्न निरीक्षक  महेंद्र गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15  वार रविवार व  दिनांक 16 वार सोमवार रोजी दोन दिवसीय  शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बीड कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे 

         अन्न भेसळ परवाना काढण्यासाठी आधार कार्ड , लाईट बिल किंवा पीटीआर , जागा किरायाने असेल तर नोटरी केलेले भाडेपत्र , पासपोर्ट फोटो , मोबाईल नंबर , ई मेल आयडी , दुकान नाव व पत्ता आदी बाबींची आवश्यकता लागणार आहे तरी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी सायली ऑनलाईन मल्टिसर्व्हिसेस मेन रोड केज या ठिकाणी दोन्ही दिवशी  सकाळी 10 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत उपस्थित राहून नवीन अथवा जुना परवाना नूतनीकरण करून घ्यावा तसेच यासंबंधी आणखीन माहिती हवी असल्यास 

8766717316 , 9881285885 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन बीड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

Saturday 14th of May 2022 04:31 PM

Advertisement

Advertisement