Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रक्तदान शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

भाजपा चे युवानेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले विविध उपक्रम

अंबाजोगाई - भारतीय जनता पक्षाचे युवानेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी १३ मे रोजी श्री.योगेश्वरी शाळा,प्रशांत नगर येथे आयोजित रक्तदान शिबीरात ६५ जणांनी रक्तदान केले.तर आरोग्य तपासणी शिबिरात ३७० रुग्णांच्या विविध तपासण्या व औषधोपचार करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे युवानेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.शुक्रवारी सकाळी योगेश्वरी शाळा,प्रशांत नगर येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे उदघाटन प्रसिद्ध श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मस्के,डॉ.संदीप थोरात,माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम, डॉ सुरेश अरसुडे,रोटरी क्लब च्या सचिव रोहणी पाठक, डॉ रेड्डी,भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी,सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक,महेंद्र निकाळजे, धोडीराम चव्हाण विनोद पोखरकर,उपस्थित होते. या अयोग्य तपासणी शिबिरात ३७० रुग्णांच्या थायरॉईड,मणकेविकार,अस्थीरोग व इतर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी मणके विकार तज्ञ व स्पाईन सर्जन डॉ.विष्णुदास खंदाडे,औषध वैद्यकशास्त्र डॉ.पिंगला आळणे,थायरॉईड तज्ञ डॉ.संजय शेळके यांनी रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले.तर यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले..या आरोग्य तपासणी शिबिरासाठी अक्षय मुंदडा मित्रमंडळाचे संयोजक डॉ.निशिकांत पाचेगावकर,कल्याण काळे,अमोल साखरे,सचिन गौरशेटे,अनंत अरसुडे,अमोल पवार, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी ,बाला पाथरकर, बळीराम चोपणे , अमोल पवार,गोपाळ मस्के,महेश अंबाड,गौरव लामतुरे, दिग्विजय लोमटे,राहुल कापसे ,मानिक पाटील,शिरीष मुकडे,श्री डांगे,संतोष जिरे,अहेमद पपूवाले ,योगेश कडबाने ,शेख सुजात ,इर्शाद शेख, दिपक सुरवसे,पद्यमनाभ देशपांडे,किरण भालेकर ,बाळा गायके,अमोल विडेकर यांनीयांनी पुढाकार घेतला.तसेच अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.योगेश्वरी देवीची महाआरती करण्यात आली. तर चनई येथील दर्गाह येथे चादर अर्पण केली. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday 14th of May 2022 02:40 PM

Advertisement

Advertisement