Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीड जिल्ह्यात जलशक्ति अभियान राबविले जाणार

शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत करावी कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

बीड - देशात २९ मार्चपासून जलशक्ति अभियान राबविले जात असून या अभियानात बीड जिल्ह्याचा देखील समावेश राहणार असून या कालावधीत जलसंवर्धनासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत कार्यवाही केली जावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले .

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत बाबत बैठक झाली यावेळी बैठकीला उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,  निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे,  जलसंधारण अधिकारी एस. एच. ठोंबरे  तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

 

भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय, नदी विकास विभाग व गंगा संरक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून जलशक्ती अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. सदर 29 मार्च ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होत आहे.

 

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील पाणी साठे यांची या माध्यमातून वाढ होऊ शकते रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे शासकीय कार्यालयांच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होऊन उन्हाळ्यातील मार्च-एप्रिल पासून जून-जुलै पर्यंत रेन हार्वेस्टिंग द्वारे इमारतींच्या परिसरातील साठवलेले पाणी वापरल्यामुळे पाणी दूर्भिक्ष कमी होऊ शकते.

 

ते म्हणाले, पाण्याचा न्याय्य वापर व्हावा अनावश्यक नळ चालू ठेवून वाया जाणारे पाण्याची बचत केली जावी. जलसंधारणाकडे लक्ष देताना जल वाचविण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले. 

 

जलशक्ति अभियान ची अंमलबजावणी देशभरात होत आहे याचा शुभारंभ 29 मार्च 2022 या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. जलस्रोतांचे पुनर्भरण करणे, रक्षण करणे आणि जलसंवर्धन करणे यासाठी हे अभियान राबविले जात असून "कॅच द रेन 2022- व्हेअर इट फॉल- व्हेन ईट फॉल "अशी टॅगलाईन या अभियानासाठी वापरली जात आहे. म्हणजेच पाऊस पडतो त्याचे पाणी साठवावे,  पावसाचे पाणी जिथे पडते तेथे आणि जेव्हा पडते तेव्हा पडते तेव्हा साठवण करण्याचा संदेश देतानाच त्याची अंमलबजावणी सुध्दा करणे असा आहे.

यावेळी बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे उपविभागीय अधिकारी के.बी.चिवरे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे बी.आर.लोंढे, सय्यद अर्षद, जलसंधारण अधिकारी बी.एन.सारणीकर, आर.डी. सोनवणे हे उपस्थित होते. 

या वेळी जलशक्ती अभियानाबाबत सादरीकरण करण्यात आले. अभियानामध्ये जिल्ह्यातील पाणी साठ्याची जिओ टॅगिंग सह माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम पुनर्भरण जलस्त्रोतांचे पुनर्जीवन आणि जलसंधारणाची संबंधित कामे या कालावधीत विविध कार्यान्वयन यंत्रणांच्या माध्यमातून  घेण्याबाबत या अभियानातून सूचित करण्यात आले आहे. यासाठी विभागीय स्तरावर जलशक्ति केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

 

यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना "जलशपथ" देण्यात आली. यामधून जल संरक्षण व जलसंवर्धनाचा मध्ये सहभाग घेण्‍याची प्रतिज्ञा घेण्यात आली. 

 

*पाच जून रोजी शासकीय कार्यालयांच्या परीसरात वृक्ष लागवड करावे- जिल्हाधिकारी*

 

जल शक्ती अभियानामध्ये जलसंवर्धन व जलस्रोतांच्या बळकटीकरण याबरोबरच वनीकरण देखील गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे जागतिक वनीकरण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये परिसरात वृक्ष लागवड केली जावी.  तसेच शासकीय परिसरामध्ये शंभर  वृक्ष रोप लावून वृक्षलागवड द्वारे त्याचे संवर्धन केले जाणे गरजेचे आहे.

Saturday 14th of May 2022 11:29 AM

Advertisement

Advertisement