अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत वृद्ध, दिव्यांग व कामगारांना छत्र्यांचे वाटप
अहेमद पप्पुवाले मिञ मंडळाचा पुढाकार
अंबाजोगाई - येथील अहेमद पप्पुवाले मिञ मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा नेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार,दिनांक १३ मे रोजी अंबाजोगाईत वृद्ध, दिव्यांग व कष्टकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी अहेमद पप्पुवाले मिञ मंडळाने पुढाकार घेतला.
भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अहेमद पप्पुवाले मित्र मंडळाच्या वतीने शहरातील सदर बाजार परीसरात वृद्ध, दिव्यांग व कष्टकरी बांधवांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून १५ छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सोबतच रस्त्यावर फिरणारे वृद्ध, दिव्यांग व गरजू व्यक्तींना खिचडीचे वाटप ही करण्यात आले. या वेळी अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी, सामाजिक कार्यकर्ते बालाभाऊ पाथरकर, पञकार शेख वाजेद, मोसिन खुरेशी, राहुल कापसे, मयूर रणखांब, अमोल वेडे, शेख हमीद, भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अहेमद पप्पुवाले व मिञ परिवार उपस्थित होता. सातत्यपूर्ण समाजकार्य करून पप्पुवाले यांनी सामाजिक बांधिलकीचा सेतू उभारला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनानुसार स्वाराती रूग्णालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद, वीज वितरण कंपनी यासह ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. तिथे उपलब्ध होत जनतेच्या विविध समस्या सोडविण्याचे काम पप्पुवाले हे अविरतपणे करीत आहेत. अंबाजोगाई शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील समाजकार्याचा माध्यमातून त्यांनी तरूण कार्यकर्त्यांपुढे आदर्श उभा केला आहे. भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अहेमद पप्पुवाले यांची शहरात ओळख आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना देखील अंबाजोगाई व परिसरातील युवकांना एकत्र करून पप्पुवाले यांनी युवक नेतृत्व अक्षय मुंदडा यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्षाने केलेली विविध लोकहिताची कामे समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम अहेमद पप्पुवाले हे सातत्याने करीत आहेत.
