Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

राष्ट्रीय डेंग्यू दिन राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे महत्व

बीड -  दि. 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन प्रत्येक वर्षी देशात साजरा करण्यात येतो.  डेंग्यूदिन साजरा करण्याचे महत्व असे की जनतेमध्ये जागरुकता आणून डासापासून प्रसार होणाऱ्या या आजारास प्रतिबंध करणे हा आहे.

            डेंग्यू ताप हा आजार विशिष्ट विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रसार एडीस इजिप्ती नावाच्या डासाच्या मादी मार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिमेंट टाक्या,रांजण,प्लास्टिकच्या रिकाम्या बादल्या,नारळाच्या करवंट्या,घरातील शोभेच्या कुंडया,निरुपयोगी वस्तू,टायर्स व कुलर इत्यादी. जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी साठवण राहिलेल्या पाण्यात होते निरुपयोगी वस्तू टायर्स व कुलर इत्यादी जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी एडीस इजिप्ती नावाची मादी अंडी घालते.एक डास एका वेळी दीडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासांची मोठी उत्पत्ती होते. 

            डेंगी ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो.डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायू दुखी असा त्रास होतो.उलट्या होतात, डोळ्यांच्या आतील बाजू दुखणे, अंगावर लाल पुरळ येणे,नाकतोंड यातून रक्तस्त्राव होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे,तोंडाला कोरड पडणे, शौच्यावाटे व उलटीतुन रक्त पडणे ही लक्षणे दिसमन येतात. अशी लक्षणे दिसून आल्सास तात्काळ नजिकच्या शासकयि रुग्णालयात दाखल करावे. तपासणी व उपचार सर्व संस्थेत मोफत उपलब्ध आहेत.भविष्यात डेंगी ताप आजाराचा उद्रे होऊ नये म्हणून आरोग्य विभागामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले असून डेंगी ताप आजारावर मात मिळवण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी खालील  प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना:

            आपल्या घरावर चाली पाणी साचू देऊ नये, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत यासाठी आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावीत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहे त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करावी. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे,पांघरूण घेऊन झोपावे,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, घराच्या छतावरील फुटके डबे टाकाऊ टायर्स,कप ,मडकी इ.वेळीच विल्हेवाट लावावी, शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्यालानाल्यांमध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे,

            डेंगी ताप आजाराची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्धआहेत. ही सर्व दक्षता  प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणार या आजारापासून दूर ठेवेल त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Friday 13th of May 2022 05:25 PM

Advertisement

Advertisement