Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मकरंद सोसायटी मोरेवाडी येथे घरफोडी

६५ हजारांचा ऐवज लंपास

अंबाजोगाई: दरवाजाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मोरेवाडी परिसरातील मकरंद सोसायटी येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मोरेवाडी परिसरात मकरंद सोसायटी येथे राहणारे नितीन श्रीकृष्णराव काळे (वय: ३८) हे आपल्या घराच्या दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गेले होते. हे पाहून चोरट्यांनी दरवाजाच्या कडी कोंड्याची स्क्रू व नट काढून घरात प्रवेश करीन घरातील बेडरूमचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये सोन्याचे मिनी गंठण, सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या दोन पिवळ्या अंगठ्या, कानातील सोन्याचे मणी मंगळसूत्र असा ६५ हजार रुपयाचे मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नितीन काळे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस नाईक सोळंके पुढील तपास करीत आहेत.

Saturday 4th of December 2021 08:59 PM

Advertisement

Advertisement