Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईच्या जन आरोग्य अभियान टीमने घेतली आ.संजय दौंड यांची भेट

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- विधान परिषदेतील जागरूक आ.संजय दौंड यांना अंबाजोगाई येथील मानवलोक सलग्न जन आरोग्य कृती समितीच्या वतीने आज त्यांच्या निवासी सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले. या निवेदनात , लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजर केंद्राचे प्रश्न, लो.सावरगाव येथील  स्त्री रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रसिध्दी देने, सिजरची व्यवस्था निर्माण करणे, एस आर टी मध्ये कोविड काळात काम केलेल्या  वर्ग-1 ते वर्ग-4 कर्मचार्‍यांचे थकलेले वेतन, काही निराधार  ज्येष्ठ नागरिकांचे बँक बदलामुळे पगारी झालेल्या नाहीत, कोरोना च्या तिसर्‍या लाटेबाबत तयारी , कोरोना मुळे  विधवा झालेल्या महिलांना त्वरित शासकीय लाभ मिळावा, प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका देने किती गरजेचे आहे. इत्यादी प्रमुख प्रश्ने होती. या बैठकीला माजी आ.पृथ्वीराज साठे ही उपस्थित होते., संजयभाऊ यांनी कोविड कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी  संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाची तात्काळ बैठक घेऊन आणि मा. पालकमंत्री यांच्या सोबत चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावन्याचे आश्वासन दिले. लो. सावरगाव येथील रुग्णालयाच्या प्रश्नां संदर्भात व इतर सुविधा बाबत मा आरोग्य मंत्री यांच्या डिसेंबर महिन्यात होणार्‍या बीड दौर्‍यात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मानवलोक व आदरणीय स्व.बाबुजींचे माझ्या कुटुंबाचे संबंध पाहता आणि आरोग्याशी संबंधित कुठल्याही समस्येला सामोरे जाण्याची माझी आजपर्यंतची पद्धत पाहता हे माझ्या मनाला पटणार नाही. तेंव्हा मी लवकरच मा. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन येत्या दोनच दिवसांत जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन हा प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असा शब्द उपस्थित समिती सदस्यांना दिला.
ओमिक्रॉम तथा तिसर्‍या लाटे बाबतीत भिती न बाळगता लोकांनी फक्त कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे लोकांच्या हलगर्जीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळेच दुसर्‍या लाटेत नुकसान झाले. परंतु झालेल्या मानवहानीला डोळ्यासमोर ठेवून आतातरी लोकांनी तिळमात्र हलगर्जी करु नये.  असे आ.संजय दौंड म्हणाले या वेळी माजी आ.पृथ्वीराज साठे, मानवलोकचे डॉ.विनायक गडेकर व जन आरोग्य अभिमानाचे महावीर भगरे, भगवंत पालवदे, सतिश कांबळे, श्याम सरवदे, व्यकंटेंश जोशी आणि पत्रकार सुनिल सिरसाट यांची उपस्थिती होती.

Saturday 4th of December 2021 07:18 PM

Advertisement

Advertisement