Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नांदडी येथे महिलांना शेतमाल प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन.

अंबेजोगाई    सुधारित कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम असल्याने तसेच शेती व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा असल्याने कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घेण्यावर विशेष भर दिलेला आहे. आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, प्रकल्प सहायक प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील नांदडी येथे शेतीशाळा उपक्रमामध्ये उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च बचतीकरिता सेंद्रीय कीटकनाशक निमास्त्र, दशपर्णी अर्क व भूसुधारक वेस्ट डीकंपोजर तयार करणे, हरभरा व ज्वारी पिकावरील अळी वर्गीय किटकांच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावण्याचे प्रशिक्षण देऊन पोकरा प्रकल्पांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणि बचत गटांसाठी असलेल्या अवजार बँक व कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती देऊन उमेद अभियान निधी, बँक कर्ज, पोकरा प्रकल्पाचे अनुदान यांच्या कृतीसंगमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन केले. शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे यांनी नाडेप कंपोस्ट खत आणि गांडूळ खत प्रकल्प उभारणीची माहिती दिली. उमेद अभियानाच्या प्रभाग समन्वयक के. एस. साखरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतमालाचे विक्री व्यवस्थापन, ग्राम संघातील निधीचा योग्य वापर, बचत गटाचे आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठीचे मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेती समन्वयक राम गंगणे यांनी गांडूळ खताच्या विक्री व्यवस्थापनाची माहिती दिली. सदर कार्यक्रमाला बलभीम शिंदे, ललिता जगताप, सुमनबाई वाघमारे, सुरेखा वाघमारे, वर्षा वाघमारे, शितल वाघमारे, मीना देशमुख, प्रमिला देशमुख आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Saturday 4th of December 2021 06:42 PM

Advertisement

Advertisement