Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लोखंडी सावरगाव येथे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांची प्रक्षेत्र भेट.

औरंगाबाद विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी लोखंडी सावरगाव येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या शेतीशाळा वर्गाच्या क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. प्रक्षेत्रावर लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यांची निरीक्षणे शेतकऱ्यांना दाखवून त्यामध्ये अडकलेले घाटे अळीचे पतंग निदर्शनास आणून दिले व एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्त्व पटवून दिले. अरुण देशमुख या शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या शून्य मशागत तंत्रज्ञानाची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे झालेले फायदे विस्तृतपणे समजावून सांगितले आणि अशाच पद्धतीने शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब इतर शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन जाधव यांनी केले. खरीप हंगामामध्ये टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड करून एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतलेले शेतकरी अरुण देशमुख यांचा कृषी सहसंचालक डॉ. डी एल जाधव यांनी सत्कार केला. जाधव यांनी शेतकऱ्यांना पोकरा प्रकल्पांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असलेल्या योजनांची विस्तृतपणे माहिती देऊन योजनेचे अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले तसेच सद्यस्थितीत पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांसोबत विस्तृतपणे चर्चा केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी आर डी बर्वे, कृषी पर्यवेक्षक एस.के.ढाकणे, कृषी सहाय्यक पी के काकडे, तट ए ए, डी.आर. रांजणकर, उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे, शेतकरी पंजाबराव देशमुख, अविनाश देशमुख, दशरथ नांदवटे, सर्जेराव टेमकर, विकास माचवे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 4th of December 2021 06:38 PM

Advertisement

Advertisement