Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गिरधारीलाल भराडिया एलआयसीच्या पुरस्काराने सन्मानित

  अंबाजोगाई (प्रतिनिधी)- राजकारण, समाजकारण तसेच व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात पुढे अग्रेसर असणारे गिरीधरीलाल भराडिया एलआयसी कंपनीचा व्यवसाय करताना मागे कसे राहतील? एलआयसी मध्ये सर्वात जास्त व्यवसाय केल्याबद्दल एलआयसी कंपनीने एम.डी.आर.टी (अमेरिका) हा बहुमान बहाल केल्याचे समजताच भराडिया यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गिरीधरीलाल भराडिया सक्रिय राजकारणात असताना अनेक वर्ष त्यांनी कै. भगवानराव लोमटे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनेक वर्ष राजकारणात काम केले सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ते एलआयसी कंपनीत जोडले गेले ते अनेक वर्षे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहचे सचिव म्हणून काम केले आहे नगरसेवक म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले सार्वजनिक जीवनात ते सतत निष्कलंक राहिले त्यामुळे कोठेही असो गिरधारीलाल भराडिया यांचा आवाज कधीही दबक्या आवाजात ऐकवयास मिळाला नाही.
विविध व्यवसाय शिक्षण राजकीय अशा क्षेत्रात त्यांचा संपर्क दांडगा असल्याने त्यांनी एलआयसीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले गिरधारीलाल भराडिया यांनी व्यवसाय व क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात त्यांनी भरारी व यश प्राप्त केले आहे एलआयसीच्या व्यवसायात त्यांनी अनेक वेळा व्यवसायाचे विक्रम मोडीत काढल्याने एलआयसी कंपनीने त्यांना एमडीआरटी (अमेरिका ) हा बहुमान बहाल केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गिरीधरलाल भराडिया यांचा राजकारण समाजकारण व्यवसाय एवढ्याच क्षेत्रात पुढाकार असतो असे नव्हे ते पहिल्यापासून योगेश्वरी देवीचे भक्त आहेत देवीच्या परिसराचा विकास होण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते भक्ताच्या सोयीसुविधा साठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत ते योगेश्वरी देवल कमेटीचे अनेक वर्षापासून सदस्य आहेत.

Friday 3rd of December 2021 07:31 PM

Advertisement

Advertisement