Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बस गाड्या जागीच थांबल्याने इंजीन लॉक होऊन गाड्या बंद पडण्याचा धोका

अंबाजोगाई: एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलीनीकरणासाठी गेल्या २५ दिवसांपासून संप सुरू आहे. या संपामुळे गेल्या २५ दिवसांपासून अंबाजोगाई आगारातील ७८ बसेस एकाच जागेवर उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे थांबलेल्या बसेस बंद पडण्याचा धोका आहे. तसेच या गाड्यांमधील बॅटया व ऑईल गोठत असल्याने इंजिन लॉक होण्याचीही भीती निर्माण झाली आहे. जागी थांबलेल्या या बसेसची काळजी घेतली गेली नाही तर महामंडळाला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागू शकतो.


एसटी कर्मचाऱ्याचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या चार आठवड्यांपासून संप सुरू आहे. अजूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून अंबाजोगाई आगारातील ७८ बस गाड्या जागेवरच धूळखात थांबलेल्या आहेत. या संपात कार्यशाळा कर्मचारीही सहभाग असल्याने आगारातील बसेसची नियमित देखभालही थांबलेली असल्याने बसेसचे मोठे नुकसान होऊ शकते. उभ्या असलेल्या बसेसला दर दोन दिवसांनी सुरू करावे लागते किंवा बॅटऱ्यांचे टर्मिनल काढून ठेवावे लागते. अन्यथा बसेस नादुरुस्त होण्याची भीती असते. एका बॅटरीची किंमत ७ ते ८ हजार रुपये इतकी आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच असल्याने बसगाडया आगारात उभ्या असल्याचे आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी सांगीतले.

Thursday 2nd of December 2021 08:49 PM

Advertisement

Advertisement