Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कै.दे.बा.ग.योगेश्वरी नूतन विद्यालयात विद्यार्थांचा स्वागतोत्सव*

 अंबाजोगाई - अंबाजोगाई शहरातील कै.दे.बा.गणगे योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता जय्यत तयारी करण्यात आली होती.     ऑनलाइनच्या आभासी शिक्षणातून बाहेर पडत ऑफलाईन शिक्षणाला सुरुवात करत असताना विद्यार्थ्यांचे माननीय मुख्याध्यापक श्री.के.बी. नांदगावकर ,ज्येष्ठ शिक्षक दि.अ.घाटे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस रुपांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्वागतोत्सवासाठी सेल्फि कट्टा बनवण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो काढण्यात आला. विद्यार्थ्यांना कोरोना विषयक जनजागृतीपर मार्गदर्शन मा. मुख्याध्यापक श्री.के.बी.नांदगावकर यांनी केले. विविध शालेय प्रार्थनांनी शालेय परिसर अगदी मंत्रमुग्ध होऊन गेला होता.

            गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार सर व रविवार पेठ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कमलाकर कापसे सर यांनी भेट दिली.रविवार पेठ केंद्र प्रमुख कापसे सरांनी प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शालेय सजावट सर्व शिक्षिकांनी केली होती. विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, पालकांकडून संमतीपत्र भरून घेणे, इत्यादी कामे सर्व शिक्षकांनी मिळून केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ज्येष्ठ शिक्षक दिलीप घाटे,अमोल जाधव,प्रभु बागल,किरण राऊतमारे, प्राची गोस्वामी, नम्रता पेठे,स्नेहा बर्दापुरे, आश्विनी खरबड,रूपाली पुसकर,सेवक अरूण पाटोळे यांनी परिश्रम घेतले.

Thursday 2nd of December 2021 07:30 PM

Advertisement

Advertisement